Type Here to Get Search Results !

Happy Birthday Wishes In Marathi For Brother


जीवनाच्या प्रत्येक वळणावर

मला भक्कमपणे साथ देणाऱ्या

माझ्या प्रिय भावाला

वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…!


तुझ्या सारखा चांगला भाऊ मिळणे

हिरा मिळण्यासारखेच कठीण आहे.

तुझ्या सोबतचे प्रत्येक नवीन वर्ष

परमेश्वराच्या आशीर्वादा प्रमाणे आहे.

तुला आनंद आणि उत्तम यश

प्राप्त होवो हीच प्रार्थना.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


हजारो नाते असतील

पण त्या हजार नात्यात एक असे नाते,

जे हजार नाते विरोधात असतांनासुद्धा

सोबत असते ते म्हणजे भाऊ

😍 हॅपी बर्थडे दादा 🌼🎂🏵️


दादा तू माझ्यासाठी अखंड प्रेरणेचा स्त्रोत आहेस,

भावापेक्षा जास्त तू माझा मित्र बनून आहेस.

तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!


परमेश्वराचे खूप खूप आभार,

की त्यांनी मला तुझ्यासारखा काळजी करणारा

भाऊ दिला.

तुला तुझ्या वाढदिवसानिमित्त अनेक अनेक शुभेच्छा…


भाऊ हा एक असा व्यक्ती असतो जो तुमच्या भूतकाळाला समजून घेतो,

तुमच्या भविष्याचा विचार करतो, आणि वर्तमानात

तुम्ही जसे आहात तसे स्वीकार करतो.

असाच एक भाऊ मला मिळाल्याबद्दल परमेश्वराचे धन्यवाद.

हॅपी बर्थडे दादा 🎂💥🎉

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.