जगातील कोणतेही शब्द मला वाटणाऱ्या
तुझ्याबद्दल च्या भावना व्यक्त करू शकत नाही.प्रिये, तुच माझे प्रेम, माझ्या आयुष्यातील प्रकाश
आणि माझे आयुष्य आहेस.
💐वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,🎂💮
जगातील एका सुंदर व्यक्ती,
विश्वासू मैत्रीण, माझी प्रेयसी व
माझ्या पत्नीला ….!
हॅप्पी बर्थडे प्रिये
तुझ्या वाढदिवशी परमेश्वराला प्रार्थना आहे की
तुझे आयुष्य हजारो वर्ष असो, व आपले नातू पणतू
तुझ्या चेहऱ्यावरील सुरकुत्या पाहून घाबरून जावो.
😅 Happy birthday Dear 🎂🎉😁❤️
तू माझे जीवन आहेस, तू माझा श्वास आहेस.
तू माझा प्रेरणास्रोत आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर तू माझ्यासाठी सर्वकाही आहेस.
प्रिय बायको तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..
तुझ्यात बायकोपेक्षा मला आयुष्यभराची
एक मैत्रीण सापडली आहे.
😍❤️ Happy birthday dear wife..! ❤️😍
भरपूर भरपूर स्वप्ने होती तिच्या उरात,
पण स्वसुखाची आशा न धरता ती आली आमच्या घरात.
ती येण्या आधी सर्व आम्ही बांधलेलो रक्ताच्या नात्याने,
पण ती नातं जोडून आली वेद मंत्राच्या वाटेने.
माझ्या बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो. नाहीच असं नाही पण तुझ्या येण्याने आयुष्याची बाग खर्या अर्थाने बहरून आली…. पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात नव्या आनंदाने बहरून आले… पूर्वीचेच दिवस तुझ्याप्रमाणे नव्या चैतन्याने सजून गेले… आता आणखी काही नको, हवी आहे ती फक्त तुझी साथ आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं ! बस्स ! आणखी काही नको… काहीच ! वाढदिवसाच्या प्रेमशुभेछा !
मी दररोज एकाच व्यक्तीच्या प्रेमात पडतो
आणि ती व्यक्ती म्हणजे माझी ‘बायको’
माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.😍
काही लोक भेटून बदलून जातात,
तर काही लोकांशी भेटल्यावर
आयुष्य बदलून जाते.
माझे आयुष्य आनंदी करणाऱ्या माझ्या पत्नीला
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..🎂
माझ्या संसाराला घरपण आणणाऱ्या
आणि आपल्या सुंदर स्वभावाने
आयुष्याला स्वर्गाहुनही सुंदर बनवणाऱ्या
माझ्या प्रिय पत्नीला
💐वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले
अश्याच पद्धतीने नेहमी आनंदाने नांदो संसार आमचा,
पती देवांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
चांगल्या व वाईट वेळेत माझ्या बाजूने उभे
असलेल्या माझ्या प्रिय पतींना वाढदिवसा निमित्त शुभेच्छा..!
माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात
आणि शेवट तुमच्या नावाने होते,
माझ्या आयुष्यातील तुमचे स्थान
नेहमीच विशेष राहील.
Happy Birthday Husband 🎂🎉